Shashikant dhotre biography of christopher
शशिकांत धोत्रे
शशिकांत धोत्रे (१ एप्रिल, १९८२:शिरापूर, मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा) हे मराठी चित्रकार आहेत.
पार्श्वभूमी
[संपादन]धोत्रे यांचा जन्म शिरापूर तालुका: मोहोळ, जिल्हा: सोलापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबिका विद्यामंदिर, शिरापूर येथे झाले. त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे आहेत. त्यांचे वडील दगड फोडणे, त्यांना टाके घालणे अशी कामे करत असत. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शशिकांत धोत्रे यांनासुद्धा लहानपणापासून खडी फोडणे, ट्रकमध्ये वाळू भरणे अशी शारीरिक कष्टाची कामे करावी लागली.[१] लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. शाळेमध्ये भिंतींवर, फळ्यावर, बाकावर ते चित्रे काढत असत. गावात दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त होणाऱ्या स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळत असे.[२]त्यांना कुटुंबातून चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नाही आणि त्यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षणसुद्धा घेतलेले नाही.
मोठेपणी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेणे शक्य आहे, असे कळल्यावर धोत्रे यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि २००३ मध्ये चित्र